फॉंट आकार

फॉंट आकारमान

सामान्य प्रश्न

युनिकोड म्हणजे काय?

युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.याचा वापर प्रामुख्याने बहुभाषिक सॉफ्टवेअरचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून होतो.युनिकोड मानकामध्ये जगातील सर्व लिखित भाषांची सर्व कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता आहे.युनिकोड मानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव दिले जाते.युनिकोड मानक व आयएसओ १०६४६ मानकाची एक विस्तारित यंत्रणा आहे जिला यूटीएफ-१६ म्हणतात ज्यामध्ये जवळपास दहा लाख कॅरेक्टर्सचे एनकोडिंग करता येते.

आपला संगणक युनिकोड / भारतीय भाषा समर्थीत कसा करावा ?

विंडोज एक्सपी ऑपरेटिंग साठी इथे क्लिक करा

विंडोज ७ ऑपरेटिंग साठी इथे क्लिक करा

इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII)म्हणजे काय?

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने इंडियन स्क्रिप्ट कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज(ISCII) हे मानक, सर्व संगणकांमध्ये आणि संवाद माध्यमांमध्ये वापरण्यासाठी तयार केले आहे.यामध्ये ७ किंवा ८ बिट कॅरेक्टरच्या वापराला परवागनगी आहे.८ बिट वातावरणात, खालील १२८ कॅरेक्टर्स माहितीच्या देवाणघेवाणीसाठी निश्चित केलेल्या आयएस १०३१५:१९८२(आयएसओ ६४६ आयआरव्ही) ७ बिट कोडेड कॅरेक्टर संचाप्रमाणे, ज्यांना एएससीआयआय(ASCII)कॅरेक्टर संच म्हणतात त्यामध्ये निश्चित केल्याप्रमाणे आहेत. वरील १२८ कॅरेक्टर्स प्राचीन ब्राह्मी लिपीवर आधारित सर्व भारतीय लिपींसाठी वापरली जातात. ७-बिट वातावरणात कंट्रोल कोड एसआय,आयएससीआयआय(ASCII)कोड सेट मागवण्यासाठी वापरता येतो आणि कंट्रोल कोड एसओ एएससीआयआय(ASCII)कोड संच पुन्हा निवडण्यासाठी वापरता येतात.

भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आहेत. पर्शियन-अरेबिक लिपींशिवाय भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर सर्व १० लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून निर्माण झाल्या आहेत आणि व त्यांच्या उच्चारांची रचना समान आहे, त्यामुळे कॅरेक्टर्सचा सामायिक संच तयार करणे शक्य झाले आहे. विविध भारतीय लिपी व डिस्प्लेची (प्रदर्शनाची) वैशिष्ट्ये वापरता यावीत यासाठी वैशिष्ट्यांचे एक यंत्रणा देण्यात आली आहे. विस्तार यंत्रणेमुळे आयएससीआयआय (ISCII)कोडसोबत अधिक कॅरेक्टर्स वापरता येतात. आयएससीआयआय(ISCII) कोड तक्ता हा ब्राह्मी आधारित लिपींसाठी आवश्यक असलेल्या सर्व कॅरेक्टर्सचा सुपर सेट आहे. सोयीसाठी अधिकृत लिपी देवनागरीच्या मुळाक्षरांचा मानकामध्ये वापर करण्यात आला आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने दिलेला आयएस१३१९:१९९१ हा मानकांसाठीचा क्रमांक माहितीच्या देवाणघेवाणीसाठीचे सर्वात अलिकडचे भारतीय मानक आहे याचा वापर भारतीय भाषांमध्ये आयटी उत्पादनांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर होतो.

युनिकोड आणि आयएससीआयआय कोडमध्ये कोणता मूलभूत फरक काय आहे?

युनिकोडमध्ये १६ बिट एनकोडिंगचा वापर केला जातो जे ६५००० पेक्षा अधिक कॅरेक्टर्ससाठी (६५५३६) कोड पॉईंट देते. युनिकोड मानक प्रत्येक कॅरेक्टरला विशिष्ट सांख्यिक मूल्य आणि नाव देते. युनिकोड मानक जगभरातील सर्व लिखित भाषांसाठी वापरली जाणारी कॅरेक्टर्स एनकोड करण्याची क्षमता देते. आयएससीआयआय ८ बिट कोड वापरते जो ७ बिट एएससीआयआय कोडचा विस्तार आहे, ज्यामध्ये १० भारतीय लिपींसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत अक्षरांचा समावेश असतो. भारतामध्ये २२ अधिकृत भाषा आहेत. पर्शियन-अरेबिक लिपींशिवाय भारतीय भाषांसाठी वापरल्या जाणा-या इतर १० लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून तयार झालेल्या आहेत आणि त्यांच्या उच्चार रचना समान आहे, ज्यामुळे सामायिक कॅरेक्टर संच बनविणे शक्य झाले. आयएससीआयआय कोड तक्ता हा ब्राह्मीवर आधारित भारतीय लिपींसाठी आवश्यक सर्व कॅरेक्टर्सचा सुपर सेट आहे. सोयीसाठी देवनागरी या अधिकृत लिपीची मुळाक्षरे मानकामध्ये वापरण्यात आली आहेत.

इनस्क्रिप्ट कीबोर्ड लेआउट म्हणजे काय?

इनस्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) ही टच टायपिंग कीबोर्ड लेआउट प्रणाली असून, संगणकावर इंडिक मजकूर टाइप करण्यासाठी वापरली जाते. भारत सरकारने या कीबोर्डचे इंडिक संगणनासाठी प्रमाणीकरण केले आहे. इनस्क्रिप्टचा सर्व इंडिक लिपींसाठी समान लेआउट आहे. भारतीय भाषांमध्ये आणि सर्व सहा भारतीय लिपींमध्ये डाटा एंट्री करण्यासाठी इनस्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) लेआउट हा डिफॉल्ट पर्याय आहे. हा लेआउट प्रमाणभूत १०१ कीबोर्ड वापरतो. हा ओव्हरले कुठल्याही सध्याच्या इंग्रजी कीबोर्डला साजेसा आहे. कॅरेक्टर्सचे मॅपिंग अशा प्रकारे केले जाते की ते सर्व भारतीय भाषांसाठी (डावीकडून किंवा उजवीकडून लिहील्या जाणाऱ्या) समान असते. याचे कारण म्हणजे भारतीय भाषांसाठीच्या मूलभूत कॅरेक्टर्सचा संच समान आहे. इनस्क्रिप्ट कीबोर्ड विंडोज २०००,XP,VISTA,LINUX,MAC यासह नव्या इनबिल्ट ऑपरेटिंग सिस्टिमसह येतो.

सॉफ्टवेअर स्थानीयकरण (लोकलायझेशन) म्हणजे काय?

स्थानिक बाजारपेठेच्या भाषाविषयक, सांस्कृतिक आणि तांत्रिक गरजेनुसार सॉफ्टवेअर उत्पादन बनविणे याला सॉफ्टवेअर स्थानीयकरण (लोकलायझेशन) असे म्हणतात.

आंतरराष्ट्रीयीकरण (इंटरनॅशनलायझेशन) म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीयीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत.डब्ल्यू३सी नुसार आंतरराष्ट्रीयीकरण म्हणजे एखादे उत्पादन,ॲप्लिकेशन अथवा दस्तावेजाचे डिझाईन (रचना) किंवा विकास अशा प्रकारे केला जातो की सांस्कृतिक, प्रादेशिक किंवा भाषिक भिन्नता असलेल्या लोकांत त्याचे सहजपणे स्थानीयकरण करता येईल.आंतरराष्ट्रीयीकरण किंवा इंटरनॅशनलायझेशन हे "i१८n" असे लिहीले जाते, कारण या इंग्रजी शब्दामध्ये 'i' आणि 'n' या अक्षरांदरम्यान १८ अक्षरे आहेत.

पारंपरिक दस्तावेज(डॉक्युमेंट)अनुवाद आणि सॉफ्टवेअर स्थानीयकरण (लोकलायझेशन) यामध्ये कोणता फरक आहे? पारंपरिक दस्तावेजाचा अनुवाद हा मुळ दस्तावेजाला पूर्ण रूप दिल्यानंतर केला जातो.तर सॉफ्टवेअर स्थानीयकरण हे मूळ उत्पादनाच्या विकासाबरोबर सुरु होते,यामुळे सॉफ्टवेअरच्या विविध भाषांमधील आवृत्या एकाच वेळी तयार होऊ शकतात.दस्तावेज अनुवाद ही स्थानीयकरणाच्या विविध उपक्रमांपैकी केवळ एक आहे,याव्यतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापन, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, चाचणी आणि डेक्सटॉप पब्लिशिंग यांचाही सॉफ्टवेअर स्थानीयकरणमध्ये समावेश होतो.

DVB-TT फॉन्ट डेटा युनिकोडमध्ये कसा कन्व्हर्ट कराल?

1. प्रथम वर्ड डॉक्युमेंट उघडा.
2.नंतर Add-Ins वर जा.
3.ISM button वर क्लिक करा.
4.convert हा पर्याय निवडा.
5.Convert To मध्ये युनिकोड हा पर्याय निवडा.
6.convert बट्टन वर क्लिक करा.

 

एक्सेल फाईल युनिकोडमध्ये कशी कन्व्हर्ट कराल ?

a) प्रथम एक्सेल फाईल टेक्स्ट(.txt) स्वरूपात साठवा.
b) ISM मधील Converter हा पर्याय निवडा.
i) टेक्स्ट(.txt) फाईल बदलणे
(1) प्रथम ISM मधील Converter (बदलणे) हा पर्याय निवडा.
(2) मराठी भाषा हा भाषेमधून पर्याय निवडा.
(3) Input format मधून Bilingual हा पर्याय निवडा.
(4) आपणास Convert करावयाची फाईल (दस्तावेज) उघडा.
(5) Output format मधून युनिकोड हा पर्याय निवडा.
(6) Convert (बदल) झालेली फाईल (दस्तावेज) साठवण्यासाठी आपणास हवे असलेले नाव देऊन हव्या त्या ठिकाणी साठवा.
(7) Convert वर क्लिक करा.
(8) Convert (बदल) झालेली फाईल(दस्तावेज) एक्सेल मध्ये उघडा.

पॉवर पाईंट(PowerPoint)प्रेझेन्टेशन युनिकोड मध्ये कसे कन्व्हर्ट कराल ?

a) प्रथम पॉवर पाईंट (PowerPoint) मधील टेक्स्ट (text) कॉपी करा.
b) ISM मधील Converter हा पर्याय निवडा.
c) टेक्स्ट (text) बदलणे
i) आपणास हवा असलेला टेक्स्ट (text) ISM Converter user interface मधून निवडा.
ii) मराठी भाषा हा भाषेमधून पर्याय निवडा
iii) Input format मधून Bilingual हा पर्याय निवडा.
iv) आपणास हवा असलेला टेक्स्ट (text) इनपूट टेक्स्ट (Input Text) मध्ये लिहा.
v) Output format मधून युनिकोड हा पर्याय निवडा
vi) convert (बदलणे) वर क्लिक(टिचकी) करा
vii) नंतर convert (बदल) झालेला टेक्स्ट (text) नवीन पॉवर पाईंट (PowerPoint) पानावर paste करा

युनिकोड मध्ये convert (बदललेल्या) फाईलमध्ये जास्त संख्येने Golu/Circle कसे आढळतात?

पूर्वी मात्रासाठी कोणतेही निकष नव्हते .कोणतीही मात्रा, प्रथम मात्राच्या अगोदर वापरली जात होती. युनिकोडच्या नियमानुसार अनावश्यक मात्रा आपण वापरू शकत नाही. Converters हा अशा अनावश्यक चिन्हांना बदलू करू शकत नसल्यामुळे आपण माहिती व्यवस्थित लिहून सुधारणे गरजेचे आहे.

ISM कोणत्या संचालन प्रणालीवर चालते ?

ISM मुख्यत विंडोज संचालन प्रणालीवर चालते.ते विंडोजच्या Win98, Win XP, Windows Vista, Windows7, Windows server 2000, 2003 आणि 2008 संचालन प्रणालीच्या standalone and network (LAN) environment मध्ये चालते संगणक परत चालू झाल्यानंतर ISM कसे स्वंयचलित चालू होईल ? ISM2000.exe file चे संक्षिप्त ठिकाण (../Program Files/ISMV5/Binary) या ठिकाणी copy (नकल)केल्यानंतर विंडोज संगणक प्रणाली चालू झाल्याबरोबर ISM चालू होईल.

भारतीय भाषेतील Inscript कळफलक मला कोठे शिकायला मिळेल ?

Inscript आणि Phonetic कळफलक बदल अधिक माहिती ISM च्या help file मध्ये मिळेल.कृपया टंकलेखनाच्या कोणत्याही अडचणीकरिता सदर help file वापरा.

टंकलेखन करताना अनावश्यक शब्द संगणकावर येतात

भारतीय भाषेत टंकलेखन करताना अनावश्यक शब्द संगणकावर येणे हा सामान्य प्रश्न आहे.कृपया ISM मधील खालील सुची तपासा. 1.प्रथम ISM चालू आहे का हे तपासा. 2.ISM सुचीमधील "Font Type" आणि उपयोगाकरिता वापरला जाणारा "Font Type" एकच असला पाहिजे.उदाहरण:जर Devanagari Bilingual Web निवडला असेल तर "Font Type" ,DVBW-TT वापरला पाहिजे. 3.कळफलकावरील script key चालू आहे का हे तपासा. 4.ISM सुचीमधील इतर settings बंद आहेत का ते तपासा. 5.वरील सर्व settings योग्य असूनदेखील अनावश्यक शब्द येत असतील तर ISM व्यवस्थित चालू आहे का ? हे पुढील ठिकाणी तपासा; ISM Menu - Tools - Editor 6.याव्यतिरिक्त आपल्या अडचणीचे समाधान झाले नाही तर कृपया जीस्ट च्या सहयोगी channel partnersशी अथवा पुढील ईमेल वर संपर्क करावा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. .

ISM V6 च्या साह्याने Corel Draw आणि Adobe products मध्ये युनिकोड टंकलेखन करता येते ?

भारतीय भाषेसाठी Corel आणि Adobe मध्ये युनिकोड अजून साहाय्यभूत नाही.हे उत्पादन युनिकोडशी साहाय्यभूत झाल्यानंतर ISM V6 मध्ये युनिकोड टंकलेखन करता येईल. सध्या Adobe Indesign 6 मध्ये भारतीय भाषेसाठी युनिकोड टंकलेखन करता येते.

अॅडॉबे इनडिजाईन (Adobe Indesign) मराठी युनिकोड कसे Enable करायचे?

  1. प्रथम Adobe Indesign फाईल उघडा.
  2. नंतर Windows मेन्यू मध्ये Utilities मध्ये जा आणि Scripts वर क्लिक करा.
  3. प्रथम Adobe Indesign फाईल उघडा.
  4. आता अॅडॉबे इनडिजाईन (Adobe Indesign) मराठी युनिकोड साठी Enable झाले आहे.
खालील इमेजेस बघा.

 

end faq

सोशल मिडियाw3c validation