फॉंट आकार

फॉंट आकारमान

महाराष्ट्र शासनाविषयी

महाराष्ट्र शासनाने आयसीटी आणि ई-प्रशासनाचा प्रसार करण्यात भारतामध्ये नेहमीच पुढाकार घेतला आहे. शासनाने नागरिकांच्या विविध गरजांचा विचार करुन उत्तम सेवा देणारे ई-प्रशासन कार्यक्रम राबवले आहेत. सार्वजनिक प्रशासनाविषयी अधिक माहिती देणे व कामकाजात पारदर्शकता आणणे यावर राज्यातल्या ई-प्रशासनाचा भर आहे. महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय भाषा मराठी आहे, त्यामुळे सर्व ई-प्रशासन उपक्रमांना मराठी भाषेचे समर्थन असणे आवश्यक आहे. मराठी भाषेतील उपक्रमांची अंमलबजावणी आणि प्रमाणीकीकरण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन अथक प्रयत्न करत आहे. राज्य शासनाने गेल्या काही वर्षात सुरु केलेले विविध ई-प्रशासन उपक्रम विकसित करायला माहिती तंत्रज्ञान संचालनालय मदत करत आहे. राज्यातील सर्व सरकारी विभागांमध्ये ई-प्रशासनाचा वापर होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने, माहिती तंत्रज्ञान धोरण तयार केले आहे. सी-डॅकने, मराठी भाषेसाठी केलेले संशोधन व विकासाचे काम लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने, सी-डॅक, पुणे येथे, मराठी भाषा संगणनाचे उत्कृष्टता केंद्र स्थापीत केले आहे.

महाराष्ट्र शासनाचे आय.टी धोरण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मिडियाw3c validation