फॉंट आकार

फॉंट आकारमान

सी-डॅक जिस्ट विषयी

भारतीय भाषांचा विचार करताना प्रामुख्याने जिस्टचा उल्लेख होतो.भारतीय भाषांना डिजिटल स्वरुपात आणण्यासाठी जिस्टने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.भाषा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जिस्ट गेली वीस वर्षांहून अधिक काळ संशोधन करत आहे.जिस्टकडे आज अनेक नवीन उत्पादने व अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे,ज्यांनी संगणकीकरणाच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे, यामुळेच जिस्ट ही भारतीय भाषांच्या संगणकीकरणातील अग्रणी संस्था बनली आहे. जिस्ट संगणकीकरणाच्या प्रत्येक क्षेत्रात संशोधन करत आहे.

भाषेच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध साधने उदाहरणार्थ,शब्द प्रक्रियाकर्ता (वर्ड प्रोसेसर),व्याकरणाशी संबंधित चेकर्स, लॅमिटायझर्स,नॅचरल क्वेरी इत्यादी सर्च प्लगइन्स,सिमँटिक वेब,व्हीडीओ तंत्रज्ञान,फाँट तंत्रज्ञान, विशेष लेखन प्रणाली,इमेज प्रोसेसिंग ऑप्टिकल कॅरेक्टर व हँडरिटन कॅरेक्टर (हस्तलिखित अक्षर) ओळख,स्पीच प्रोसेसिंग,एम्बेडेड व मोबाईल संगणकीकरण यासारख्या क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश आहे. जिस्ट भारतीय भाषांचा विकास करण्यास कटीबद्ध आहे,जिस्टच्या संशोधन-प्रयोगशाळेने प्रभावी उत्पादनांच्या क्षेत्रात व्यापक काम केले आहे व ती भारतीय भाषा विकासाच्या प्रक्रियेचे नेतृत्व करत आहे. जिस्टचे तंत्रज्ञान हे संगणकाच्या विविध महत्वाच्या कामांचा अविभाज्य भाग बनले आहे.

संगणकीकरणाच्या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून जिस्टच्या तंत्रज्ञानाने राष्ट्रीय पुनर्बांधणीच्या कार्यात महत्वाचे योगदान दिले आहे यामध्ये प्रामुख्याने प्रशासन, शिक्षण, शेती, आरोग्य, बँकिंग व दळणवळणाची साधने इत्यादी प्रशासकीय क्षेत्रांचा समावेश आहे. जिस्ट मानकीकरणाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहीली आहे व बीआयएस, आयसीएएनएन, डब्ल्यू३सी व युनिकोड इत्यादी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांना जिस्टने आपल्या तज्ञ सेवा दिल्या आहेत.

भारतीय भाषांमधील संवाद (देवाण-घेवाण) सुलभ करणे हे जिस्टचे घोषवाक्य आहे.सी-डॅक जिस्टचे संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सोशल मिडियाw3c validation