फॉंट आकार

फॉंट आकारमान

सी.ओ.ई ची उद्दिष्ट्ये

संगणकात टंकलेखण करण्याविषयीची मानके (इनपुटींग स्टँडर्डस्), साठवणुकीची मानके (स्टोअरेज स्टँडर्डस्) व फाँटची मानके (फाँट स्टँडर्डस्) अशा मूलभूत मानकांसंदर्भात सी.ओ.ई. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाला मदत करेल. त्याशिवाय वर्ल्ड वाईड वेब कंसोर्टियम(W3C), युनिकोड, आयकॅन (इन्टरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइंड नेम्स एंड नंबर्स) अशा आंतरराष्ट्रीय सहकार्य गटांमध्ये व इतर स्थानीकीकरण तसेच प्रमाणीकीकरण मंडळांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी मदत करेल. यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळेल. या उपक्रमामुळे विविध प्लॅटफॉर्म्स व मल्टी मोडल डिव्हाईसेसना मराठी मध्ये सहज काम करता येईल.

हे केंद्र मराठी भाषेतील शब्दकोश, ई-पुस्तके, ऑडिओ पुस्तके, इंटरॲक्टिव्ह पुस्तके व इतर उपलब्ध ज्ञानाचा साठा तयार करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती/मार्गदर्शक तत्वे विकसित करेल. तसेच, प्रमाणभूत शब्दकोश, पर्याय शब्दकोश, फ्युएल (फ्रिक्वेंटली युज्ड एंट्रिज फॉर लोकलायझेशन)शब्दसंग्रह साठा, सीएलडीआर(कॉमन लोकेल डाटा रिपॉझटरी) विकसित करायला माहिती तंत्रज्ञान संचालनालयाला मदत करेल, ज्यांचा वापर ई-प्रशासनाची ॲप्लिकेशन विकसित करण्यासाठी केला जाईल. हे केंद्र जागतिकीकरण व स्थानीयकरणातील सर्वोत्तम पद्धती/मार्गदर्शक तत्वांचे पालन करेल. वेब व डेस्कटॉप ॲप्लिकेशन विकसित करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी पाहणे, तांत्रिक समस्यांवर तोडगा काढणे, यांचाही समावेश आहे.

सोशल मिडियाw3c validation